कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी भारत सरकारने लॉकडॉऊन केले आहे . या काळात घरबसल्या विरंगुळ्यासाठी तरुण वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत आहेत . अशावेळी घरबसल्या तरुणांच्या ज्ञानात भर टाकून इतिहासाप्रति डोळस दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्णाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने " *मराठाकालीन नाणी अन टाकसाळी* " या ऑनलाईन कार्यशाळेचे व्हाट्स अँप च्या माध्यमातून आयोजन मंडळाच्या सचिवा मृणाली शेटे यांनी केले आहे .
पश्चिम महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ छ . शिवाजी महाराजांनी रोवली अन आपल्या राज्याभिषेकावेळी स्वतःचे चलन निर्माण केले . सातारच्या छ .शाहूमहाराजांच्या काळात संपूर्ण भारतात मराठयांचे साम्राज्य पसरले . तंजावर पासून पेशावर पर्यँत मराठ्यांच्या टाकसाळी निर्माण झाल्या . *शिवाजी महाराज यांनी पाडलेले होन व शिवराई तसेच छ .संभाजी , छ. राजाराम , छ . शाहू आदी छत्रपतींच्या नाण्यांपासून पेशवे , मराठा मंडळातील होळकर , गायकवाड, शिंदे , नागपूरकर भोसले आदींच्या नाण्यांची ओळख* करून देण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस मंडळाचे अध्यक्ष व या कार्यशाळेचे समन्वयक शिवप्रसाद शेवाळे यांनी मंडळासमोर मांडला . अन कार्यकारी मंडळाने यास परवानगी देऊन ही कार्यशाळा सुरू झाली . यास पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा . अक्षय लाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .
या कार्यशाळेत *मराठा नाण्याची ओळख , शिवराई चे विविध प्रकार, नाणी पाडण्याची पद्धत , नाण्यांचा इतिहास , खरी अन खोटी नाणी कशी ओळखायची ? संग्रह कसा करायचा ?* आदींचे प्रशिक्षण या कार्यशाळेद्वारे दिले जात आहे . या कार्यशाळेला मार्गदर्शन कोल्हापूरातील *मराठा नाण्यांचे प्रसिद्ध संग्राहक व अभ्यासक विद्याधर गोखले करत आहेत .* या कार्यशाळेत मंडळाचे शिवप्रसाद शेवाळे , मृणाली शेटे , स्वप्नील पाटील , सुदर्शन पांढरे , शिवतेज तालुगडे आदी कार्यकर्त्यांच्या सह 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत .
राजू शेख
📋प्रसिद्धीप्रमुख📋
*पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा*




8 टिप्पण्या
लवकरच प्राचीन नाण्यांच्यावरही कार्यशाळा घेऊ ..😊
उत्तर द्याहटवाअभिनंदन पुडील वाटचालीस शुभेच्छा
उत्तर द्याहटवाआपले नाव ब्लॉग ला दिवस नाही . मंडळ आपले आभारी आहे .
हटवाछान
उत्तर द्याहटवाचांगल्या पद्धतीने माहिती देत आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाआपले नाव ब्लॉग ला दिवस नाही . मंडळ आपले आभारी आहे .
हटवाकार्यशाळेत सहभागी होता येईल का.? 🙏🙏
उत्तर द्याहटवापुढच्या वेळी नक्की कळवतो . ही बॅच फुल्ल आहे ..
हटवा