तुम्हाला माहित आहे का ? शिवाजी
महाराजांनी एक लक्ष चाफ्याची फुले वाहिलेले मंदिर !
- जिंकला तेव्हा शिवाजी महाराज पुन्हा ह्या गडावर आले.
पन्हाळ्यावर सध्या तहसीलदार ऑफिस समोर
सोमेश्वर नावाचे प्रसिद्ध तळे आहे. ह्या तळाच्या काठावर सोमेश्वर महादेवाचे मंदिर
आहे. मंदिर व तळे परिसर खूपच सुंदर आहे. या मंदिरात जेव्हा शिवाजी महाराज
राज्याभिषेकापूर्वी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांच्या कडून १ लक्ष
सोनचाफ्याची फुले वाहीली होती . असे शहाजी महाराजांच्याकडून शिवरायांच्या पदरी
आलेले जयराम पिंडे या कवीने आपल्या पर्णालपर्वत ग्रहणाख्यान या पुस्तकात लिहिले
आहे. तळ्याची मांडणी खूप सुंदर आहे. चारी बाजूस बांधीव घाट आहे. तळ्याच्या
उत्तरेला सोमेश्वरचे मंदिर आहे. या तळ्यातील अतिरिक्त पाणी तळ्याबाहेर जाण्याची
सोय केली आहे. या तळ्यातून मोठ्या प्रमाणात काळाकभिन्न दगड काढला गेला यातून
पन्हाळ्याच्या अनेक वास्तू उभा राहिल्या असतील यात शंका नाही.तसेच गडावरील कुमकेस
मोठ्या प्रमाणात या पाण्याचा उपयोग होत असणार . आजही पन्हाळ्यातील स्थानिक या
पाण्याच्या वापर करताना दिसत आहेत. या तळाच्या काठावरील शिलालेख सध्या कोल्हापूर
येथील टाऊन हॉल म्युझियम, कोल्हापूर येथे आहे . या शिलालेखाचे मु. गो. गुळवणी यांनी आपल्या पन्हाळा ते विशाळगड
या पुस्तकात असे वाचन दिले आहे कि , “हा तलाव कधी व कोणी बांधला हे तुला समजण्याची
इच्छा असेल तर मला गौरवाने विचार. याची तारीख पन्हाळ्याच्या तळ्याचा दरवाजा आहे.
मलीक ईस्कंदर याने हा बांधला.” दगडाच्या बाजूवर “ सुलतान महमंदशहा बहामनी या न्यायी
सुलतानाच्या कारकिर्दीत परमेश्वर त्याच्या मुलखाचे व अंमलाचे रक्षण करो. आदिलखान
गाझी याच्या कारकिर्दीत मलीक हैदर ईस्कंदर बहारदारी याच्या सूचनेवरून या तलावाचे
काम करण्यात आले. गाझीच्या सुदैवाने दिवस वृद्धिंगत पावोत आणि त्यांचे वैभव अक्षय
होवो.”
शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन
झालेला पन्हाळा आणि एक लक्ष सोनचाफ्याची फुले वाहिलेले मंदिर पाहायला नक्की या !

2 टिप्पण्या
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा